About us

मित्रांनो gadget नावं जरी ऐकल ना, तर माझ्या डोळ्यावरची चमक पाहण्यासारखी आहे. नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन मला Tech realated books, video, article वाचायला आवडते. मित्रांनो तुमच्याकडे थोडा वेळ असला, तर मी माझ्या टेक्नॉलॉजी बद्दलचा थोडा Experience आणि Tech सोबत माझी नाळ कशी जुळली हे सांगणार आहे.

ही गोष्ट आहे, 8वी किंवा 9वीची म्हणजेच (2007-08ची) आम्ही नवीन गाडी घेतली होती, स्प्लेंडर (hero Honda company), तेव्हा त्या गाडीवर एक मोबाईल भेटला होता, Motorola कंपनीचा. तेव्हा पहिल्यांदा मला कळालं की मोबाईल काय असतो. तेव्हा मी त्या मोबाईलची setting पासून ते सगळया गोष्टी घोळून पिवून गेलो होतो. याचा अर्थ की, मला मोबाईल मधल सगळंच माहित झालं होतं. थोड्या दिवसांनी तो मोबाईल बंद पडला. पण नंतर नविन मोबाईल काही घेता आलं नाही.

sony ericsson walkman

नंतर मी डिप्लोमा पास झालो, तेव्हा मला एक मोबाईल घेऊन दिला, तो म्हणजे Sony Ericsson चा walkman smartphone. या mobile ने माझं जीवन बदलून टाकल. मित्रांनो अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे मला डिप्लोमा फर्स्ट इयरलाच असताना एक लॅपटॉप (Laptop )घेऊन दिला होता. त्यामुळे मला technology बद्दलच्या बऱ्याच गोष्टी माहित झाल्या होत्या.

तेव्हा माझा गुरु होता, गौरव पाटील नावाचा. हा कोणी youtuber नसून माझा मित्र आहे. तो शाळेत असताना त्याला desktop घेऊन दिल होता. मी जेवढ्या काही technology बद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकलो असेल, तो म्हणजे आमचे परम मित्र गौरव याच्याकडून. मी त्याला कधीच विसरणार नाही. म्हणूनच त्याच नावं मी या ब्लॉगमध्ये mention केलं आहे.

तर मित्रांनो मला technology बद्दल बऱ्याच गोष्टी कळाल्या होत्या. म्हणूनच मला सगळेजण जेव्हा पण त्यांना नवीन मोबाईल घ्यायचा असतो, तेव्हा ते मला विचारत असत. मला Ram, Rom, memory card, display, battery, आणि कोणती सिस्टीम चांगली आहे. या सगळ्या गोष्टी बद्दल मला माहीत होतं. म्हणूनच मला सगळेजण विचारत असतात. तेव्हा मी विचार केला की आपण एक ब्लॉग तयार करून ही माहिती लोकापर्यंत पोहोचवू शकतो. आतापर्यंत मी सगळ्याच कंपनीचे मोबाईल वापरले आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढे पैसे आले कुठून, तर मित्रांनो मी पहिल्यापासूनच म्हणजे 2016 पासून ब्लॉगिंग करतो. म्हणून मी या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. तर मित्रांनो आशा करतो की, माझ्या पोस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटत असेल.

जर तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्या Official मेल mail ला किंवा पोस्टच्या कमेंट मध्ये सांगू शकता.

Offical mail ID 📬- liveMarathi844@Gmail.com