100 फॉलोअर्स असलेले युजर्स देखील इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवू शकतात

मित्रांनो इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जे पुढील प्रमाणे दिले आहेत.

Instagram ॲप उघडा आणि उजव्या बाजूला प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.

यानंतर तुम्हाला तीन ओळींच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला ऑर्डर आणि पेमेंट्स अंतर्गत Meta Verified चा पर्याय मिळेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

येथे तुमचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रोफाइल तुमच्या समोर दिसतील. त्यापैकी तुम्हाला इन्स्टाग्राम निवडावे लागेल.

या स्टेप्समध्ये युजर्सला ओळख दाखवण्यासाठी सरकारी डॉक्युमेंट विचारले जाईल.

यानंतर, तुम्हाला पेमेंटसाठी पुढे जावे लागेल आणि काही वेळानंतर, प्रोफाइलवर ब्लू टिक दिसू लागेल.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यासाठी तुम्हाला दरमहा 699 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर ब्लू टिक बंद होऊन जाईल.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.