मोबाईलला नेटवर्क येत नाही म्हणून सिमकार्ड पोर्ट करताय, मग पोस्ट नक्की वाचा | How to fix mobile network not available on android

मित्रांनो स्मार्टफोनमध्ये खराब नेटवर्कमुळे कनेक्टिव्हिटी, कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंतच्या सर्वाच कामामध्ये अडथळे येऊ शकतात. जर आपल्याला सतत या समस्यांना सामोरे जावं लागत असल्यास, आपण काय करतो लगेच कंपनी स्विच करण्याचा विचार करतो आणि हे स्वाभाविक आहे.

पण मित्रांनो सिम पोर्ट करण्यापूर्वी तुम्ही खालील काही गोष्टी करून पहा. ज्यामुळे तुमच्या फोनमधील नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते आणि तुम्हाला सिम पोर्ट करण्याची गरजच पडणार नाही (How to fix mobile network not available on android)

मोबाईलला नेटवर्क येत नाही म्हणून सिमकार्ड पोर्ट करताय, मग पोस्ट नक्की वाचा | How to fix mobile network not available on android

नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा

  • चांगल्या सिग्नलसाठी, तुम्ही तुमच्या फोनच्या नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करू शकता.
  • सेटिंग्ज>नेटवर्क सेटिंग्ज > नेटवर्क सेटिंग्ज रीसेट ऑप्शन मध्ये जा.
  • लक्षात घ्या की यामुळे सर्व सेव्ह केलेले Wi-Fi नेटवर्क आणि ब्लूटूथ कनेक्शन हटवले जातील.

सिम कार्ड बदला

  • कधीकधी, नेटवर्क समस्या ही सिम कार्डमधील खराब्यामुळेही पण होऊ शकते.
  • तुमच्या नेटवर्क ऑपरेटरच्या स्टोअरला भेट देऊन तुम्ही विनामूल्य नवीन सिम कार्ड बदलू शकता.

फोन रीस्टार्ट करा

  • नेटवर्क समस्या अधिक जास्त असल्यास, तुमचा फोन रीस्टार्ट करा.
  • यामुळे तुमच्या डिव्हाइसची संपूर्ण प्रणाली रीफ्रेश होईल आणि अनेक लहान सॉफ्टवेअर-संबंधित समस्या दूर होऊन जातील.

हे सुध्दा वाचा:- मोबाईलला नेटवर्क येत नाही म्हणून सिमकार्ड पोर्ट करताय, मग पोस्ट नक्की वाचा 

सिग्नलची ताकद तपासा

  • कमकुवत सिग्नलमुळे अनेकदा नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये अडचणी येतात.
  • तुमच्या फोनमधील सिग्नल बार तपासून तुम्ही तुमच्या परिसरातील सिग्नलची ताकद तपासू शकता.
  • जर तुम्हाला कमी सिग्नल मिळत असेल तर तुम्ही नेटवर्क कव्हरेज चांगल्या असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकता.

NOTE:- मित्रांनो या टिप्सने तुमच्या फोनमधील नेटवर्क कार्यक्षमता सुधारण्यास मदत झाली नाही तर, तुम्ही नेहमीच तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधू शकता किंवा दुसऱ्या ऑपरेटरवर स्विच करण्याचा विचार करू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.

Telegram channelLink

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *