मित्रांनो आजच्या या तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे हॅकिंगच्या घटनांमध्येही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की युजर्सच्या गुगल अकाउंटवर मालवेअरचा धोका आहे. हॅकर्स कोणत्याही पासवर्डशिवाय गुगल अकाउंट हॅक करू शकतात. ते पण कुकीजद्वारे डेटामध्ये प्रवेश करतात. चला तर जाणून घेऊया बद्दलची संपुर्ण माहिती.
पासवर्डशिवाय सुध्दा तुमचे google accounts hack होऊ शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Hackers can now access your Google account without password
पासवर्डशिवाय गुगल अकाउंट हॅक होणार का?
सायबर सिक्युरिटी कंपनी CloudSEK ने यूजर्सच्या गोपनीयतेबाबत महत्वाची माहिती सादर केली आहे. कंपनीनुसार, हॅकर्स पासवर्डशिवाय गुगल अकाउंट हॅक करू शकतात. वास्तविक, काही मालवेअर ॲप्स आहेत जे कुकीजच्या मदतीने फोनचा डेटा ऍक्सेस करू शकतात आणि नंतर यामुळे Google account हॅक होतात.
पासवर्ड रीसेट केल्यानंतरही या गोष्टी होऊ शकतात का?
अहवालात असे म्हटले आहे की हे मालवेअर फोनमधील संवेदनशील डेटा आणि Google खात्याचा पासवर्ड कुकीजद्वारे हॅक करतात आणि त्रासदायक बाब म्हणजे पासवर्ड रीसेट केल्यानंतरही आपल्या Google activity या हॅकर्सपर्यंत पोहोचत राहतात.
ऑक्टोबर 2023 मध्ये हा मालवेअर सापडला
या मालवेअरची माहिती पहिल्यांदा एका टेलीग्राम चॅनलद्वारे ऑक्टोबर 2023 मध्ये देण्यात आली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की आम्ही क्रोम ब्राउझर किंवा कुकीजद्वारे कोणत्याही सर्च ब्राउझरला प्रवेश देतो, ज्याचा वापर Google खाते हॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो.
स्वतःला असे सुरक्षित ठेवा
अशा मालवेअरपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही ब्राउझरमध्ये प्रवेश करू देऊ नका आणि Google Chrome वर सुरक्षित ब्राउझिंग करत रहा.
Note – मित्रांनो आशा करतो तुम्हाला Hackers can now access your Google account without password ही पोस्ट आवडली असेल. खूप महत्त्वाची माहिती आहे तर नक्की शेअर करा.