Whatsapp वर एखादा contact block किंवा कंप्लेंट करायची आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to block and report contacts on whatsapp step by step process in marathi

मित्रांनो सध्या लाखो युजर्स व्हॉट्सॲप वापरत आहेत. युजर्सना सुविधा देण्यासाठी, Meta च्या मालकीचे हे प्लॅटफॉर्म युजर्सना सुविधा देण्यासाठी वेळोवेळी अपडेट्स आणत असते. आजच्या पोस्टमध्ये आपण व्हॉट्सॲपवर संपर्क क्रमांक कसा ब्लॉक आणि रिपोर्ट करायचा हे जाणून घेणार आहोत.

Whatsapp वर एखादा contact block किंवा कंप्लेंट करायची आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to block and report contacts on whatsapp step by step process in marathi

Whatsapp Contact block कस करायचं? |How to block a whatsapp number

  • स्टेप 1- कोणताही संपर्क क्रमांक ब्लॉक करण्यासाठी, त्या युजर्सचे चॅट open करा.
  • स्टेप 2- यानंतर तीन टिपका असलेल्या आयकॉनवर क्लिक करा.
  • स्टेप 3- येथे रिपोर्टच्या खाली ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल.
  • स्टेप 4-त्यावर क्लिक करा आणि नंतर कन्फर्म करा.

Whatsapp Contact ची तक्रार याप्रकारे करू शकता? |How to report a whatsapp number

जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर तुम्हाला स्पॅम करत आहे किंवा काही चुकीची ॲक्टिव्हिटी होत आहे, तर व्हॉट्सॲप अशा नंबरची तक्रार करण्याची सुविधाही देते. यासाठी सुध्दा काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता.

  • स्टेप्स 1- तुम्हाला ज्या युजर्सची तक्रार करायची आहे त्याच्या चॅट उघडा.
  • स्टेप 2- यानंतर, तीन बिंदूंवर क्लिक करा आणि नंतर ‘More’ वर क्लिक करा.
  • स्टेप 3- येथे पहिल्या क्रमांकाची तक्रार करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच पुन्हा एकदा रिपोर्ट ऑप्शन दिसेल. ज्यावर टॅप करून नंबर ब्लॉक केला जाईल.

हे सुध्दा वाचा:- ऑनलाइन पासपोर्ट अपॉइंटमेंट बुक करायची आहे? मग या स्टेप्स फॉलो करून करा बुक

अनब्लॉक कसे करावे?

तुम्हाला पुन्हा एखादा संपर्क अनब्लॉक करायचा असेल, तर तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अनब्लॉक करण्यासाठी, त्याच स्टेप्स फॉलो करावे लागेल. येथे चॅट बॉक्समध्ये अनब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर युजर अनब्लॉक होईल.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *