एक AC एका तासात किती वीज वापरतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to calculate electricity consumption of 1 ton ac india

मित्रांनो उन्हाचे चटके आतापासूनच बसायला लागले आहेत. कारण देशातील अनेक भागात उन्हाळ्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत कुलर, पंखे म्हणजेच त्याला आपण फॅन म्हणतो, एसी बाहेर आले आहेत. मित्रांनो उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण AC ला वीजही खूप लागते. आज आपण जाणून घेणार आहोत की, एक AC एका दिवसांत किती वीज वापरतो (How to calculate electricity consumption of 1 ton ac india)

एक AC एका तासात किती वीज वापरतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to calculate electricity consumption of 1 ton ac india

किती वीज वापरली जाते?

मित्रांनो साधारणपणे, 1 टन एसी आणि 1.5 टन एसी याचं AC जास्त करुन मार्केटमध्ये दिसतात. एक टन एसी म्हणजे 1000 वॅट्स आणि 1.5 टन म्हणजे 1500 वॅट्स. एक टन एसी (Air conditioner) 1000 वॅट वीज वापरते. पण आता प्रश्न असा आहे की, हा विजेचा वापर किती काळ टिकतो याचं उत्तर पण आज आपण तर जाणून घेऊया.

मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, एक टन क्षमतेचे दोन एसी वेगवेगळ्या पॉवर वापरू शकतात. हे त्यांच्या रेटिंगवर अवलंबून आहे. हे सहज समजून घेण्यासाठी, समजा तुमच्याकडे एक टन वजनाचा एसी आहे, ज्याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे, तर ते एका तासात 1000 वॅट्स म्हणजेच 1 युनिट वीज वापरेल.

रेटिंग आणि कूलिंग क्षमता

तुमच्या लक्षात आले असेल, तर त्याचे EER (Energy Efficiency Energy) किंवा ISEER रेटिंग आणि कूलिंग क्षमता AC वर दिलेली आहे. ज्यामुळे विजेचा वापर सहज काढता येतो. जर तुमच्या AC चे EER रेटिंग 0.92 असेल आणि तुमच्या AC ची कूलिंग क्षमता 1000 असेल. या ठिकाणी आपल्याला एक फॉर्मुला लागू करावा लागेल. तुम्ही EER रेटिंगने कूलिंग क्षमता विभाजित होते.

हे सुध्दा वाचा:- टीव्हीवर Android स्मार्टफोन डिस्प्ले कसा कास्ट करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

8 तासात किती युनिट्स होतात

0.92 ला 1000 ने भागल्यास 1086 मिळते. म्हणजेच तुमचा AC एका तासात 1086 वॅट वीज वापरते. दुसरीकडे, 1.5 टन एसी 1500 वॅट पॉवर वापरतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही दिवसाचे 8 तास एसी वापरलात तर तो दररोज 12 युनिट वीज वापरेल.

यानुसार एका तासात सरासरी 1.5 युनिट वीजवापर होतो. तुमच्याकडे 9 ते 10 रुपये प्रति युनिट वीज असेल, तर तुम्हाला एक तास एसी चालवण्यासाठी 15 ते 16 रुपये खर्च करावे लागतील.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *