तुमचा स्मार्टफोन बनावट तर नाही ना! जाणून घ्या कस चेक करायचं? |How To Check Your Phone Is Original Or Fake in marathi

मित्रांनो स्मार्टफोनमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. एखादा मोबाईल लॉन्च (new mobile launch 2024) होण्याच्या आधीच लोकांमध्ये क्रेझ असतो. पण मित्रांनो आज मार्केटमध्ये असे अनेक बनावट मोबाईल आले आहेत ज्यामुळे खूप फसवणूक होत आहे. अशा स्थितीत एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे खरा आणि बनावट स्मार्टफोन कसा ओळखायचा. आज आम्ही तुम्हाला काही स्मार्ट ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही खरा आणि बनावट स्मार्टफोन सहज तपासू शकता.

तुमचा स्मार्टफोन बनावट तर नाही ना! जाणून घ्या कस चेक करायचं? |How To Check Your Phone Is Original Or Fake in marathi

अशा प्रकारे खरा फोन ओळखा शकता

  • सर्वातपहिले तुमच्या मोबाईल फोन किंवा कम्प्युटरवर ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp शोधा.
  • आता तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • नंतर तुम्हाला तुमचा IMEI नंबर टाकावा लागेल.
  • जर IMEI नंबर ब्लॉक दाखवत असेल तर तो स्मार्टफोन खोटा आहे. अशा प्रकारे तुमचा मोबाईल खरा आहे की खोटा हे तुम्हाला कळते.

मेसेजद्वारे सुध्दा खोटा फोन तपासू शकता

  • तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन KYM लिहावे लागेल, त्यानंतर एक स्पेस देऊन 15 अंकी IMEI नंबर भरा.
  • आता 14422 या क्रमांकावर संदेश पाठवा.
  • यानंतर रिप्लायमध्ये ‘IMEI IS VALID’ अस आढळल्यास तुमचा स्मार्टफोन हा खरा आहे.

हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोन आणि लॅपटॉपची कॅशे आणि कुकीज फाईल कशी हटवायची?

ॲपसह सुध्दा जाणून घेऊ शकता

  • सगळ्यात पहिले मोबाईलमध्ये KYM ॲप इंस्टॉल करा.
  • आता तुमचा 15 अंकी IMEI नंबर टाका.
  • यानंतर, मोबाइल कंपनी, ब्रँड, मॉडेल आणि ते कोणते उपकरण आहे हे स्क्रीनवर दिसेल.
  • जर तुमचा स्मार्टफोन खोटा असेल तर ब्लॉक शो असेल.

IMEI नंबर कसा तपासायचा?

तुम्हाला तुमच्या फोनवर *#06# हा नंबर डायल करावे लागेल. यानंतर तुम्हाला IMEI नंबर दिसेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुमचा मोबाईल dual sim असेल, तर तुम्हाला दोन IMEI नंबर दिसतील.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *