स्मार्टफोन आणि लॅपटॉपची कॅशे आणि कुकीज फाईल कशी हटवायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to remove smartphone and laptop cache and cookies

मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का की, तुमची ब्राउझिंग हिस्टरी (browsing history) ट्रॅक होण्यासाठी कुकीज हे प्रमुख कारण बनू शकतात. मित्रांनो तुम्ही पण इंटरनेट वापरत असताना कोणत्याही वेबसाइटवर असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या विशिष्ट उत्पादनाची जाहिरात पुन्हा पुन्हा डिस्प्लेवर दिसते. एवढेच नाही तर, कुकीजमुळे तुमच्या डिव्हाईसचे स्टोरेजही भरू लागते. एकंदरीत, फोन आणि लॅपटॉपमध्ये कुकीज दीर्घकाळ टिकून राहिल्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला गुगल क्रोमवरील कुकीज हटवायची असतील, आज आपण जाणून घेऊया की How to remove cache and cookies from chrome.

स्मार्टफोन आणि लॅपटॉपची कॅशे आणि कुकीज फाईल कशी हटवायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to remove smartphone and laptop cache and cookies

लॅपटॉपवरील कुकीज कशी हटवायची?

  • सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.
  • आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला क्लियर ब्राउझिंग डेटा वर टॅप करावे लागेल.
  • Clear Browsing Data चा पर्याय दिसत नसेल तर हा पर्याय Chrome सेटिंग्जवरील गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये दिसेल.
  • येथे तुम्ही कुकीज आणि कॅशे फाइल्सवर टिक करून हटवू शकता.

हे सुध्दा वाचा:- एक WhatsApp account किती device मध्ये वापरु शकतो, जाणून घ्या याबद्दल संपुर्ण माहिती

फोनवरील कुकीज कशा हटवायची?

  • सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.
  • आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला Chrome सेटिंग्जवरील गोपनीयता आणि सुरक्षिततेवर टॅप करावे लागेल.
  • आता तुम्हाला क्लियर ब्राउझिंग डेटा वर टॅप करावे लागेल.
  • येथे तुम्ही कुकीज आणि कॅशे फाइल्सवर टिक करून हटवू शकता.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कुकीज डिलीट करण्याचा अर्थ तुम्ही Google वर लॉग इन केलेल्या सर्व वेबसाइटवरून साइन आउट करण्याचा होईल. कॅशे केलेल्या इमेज आणि फाइल्स हटवण्याचा अर्थ असा होईल की तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील स्टोरेज मोकळे कराल. तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधील कॅशे आणि कुकीज काढून टाकु शकता.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *