मित्रांनो तुम्ही पण मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप (Whatsapp) वापरत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल. तो म्हणजे एक व्हॉट्सॲप अकाऊंट किती Device मध्ये वापरु शकतो? चला तर जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नाचे उत्तर.
एक WhatsApp account किती device मध्ये वापरु शकतो, जाणून घ्या याबद्दल संपुर्ण माहिती |How To Use The Same WhatsApp Account On Multiple Phones?
एक WhatsApp खाते किती Device वर वापरले जाऊ शकते?
- मित्रांनो तुम्ही एकाच वेळी चार लिंक केलेल्या डिव्हाइसवर WhatsApp वापरू शकता. म्हणजेच प्रायमरी डिवाइस शिवाय इतर चार डिवाइसवर व्हॉट्सॲप वापरता येते.
- वास्तविक, एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर एक WhatsApp खाते वापरणे हा चॅटिंग ॲपचा Companion Mode आहे. प्राथमिक उपकरणाशी लिंक केल्यावर WhatsApp इतर उपकरणांवर वापरले जाऊ शकते. व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार, एकदा तुम्ही दुसरे डिव्हाईस प्रायमरी फोनशी कनेक्ट केले की, 14 दिवसांसाठी पुन्हा डिव्हाइस कनेक्ट करण्याची गरज भासणार नाही.
- पण दर 14 दिवसांनी फोन कनेक्ट करणे आवश्यक असेल. प्राथमिकसह दुय्यम डिव्हाइसवर WhatsApp वापरण्यासाठी, तुम्ही सर्व डिव्हाइसवर WhatsApp अप टू डेट ठेवणे महत्त्वाचे आहे.
QR कोडद्वारे डिव्हाइस लिंक करा
सेकंडरी डिवाइस
तुम्हाला ज्या डिव्हाईसला लिंक करायचे आहे त्यावर तुम्हाला WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप उघडावे लागेल. आता एक QR कोड दिसेल जो प्राथमिक फोनवरून स्कॅन करावा लागेल.
हे सुध्दा वाचा:- घरचं WiFi नीट काम करत नाहीये, मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी
अशा प्रकारे इतर डिव्हाइसेसना Android प्रायमरी फोनशी लिंक करा
- तुम्हाला तुमच्या Android प्रायमरी फोनवर WhatsApp उघडावे लागेल.
- आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला Linked Device वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला लिंक ए डिव्हाइसवर टॅप करावे लागेल.
- यामुळे प्रायमरी फोनचा कॅमेरा चालू होईल.
- दुसऱ्या डिव्हाइसचा QR कोड प्रायमरी फोनच्या कॅमेऱ्याने स्कॅन करावा लागेल.
- स्कॅन केल्यानंतर, व्हॉट्सॲप इतर डिव्हाइसशी कनेक्ट केले जाईल आणि चॅट थोड्याच वेळात लोड होईल.
तुम्ही तुमच्या प्रायमरी फोनवर लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर टॅप करून लिंक केलेल्या डिव्हाइसेसची एकूण संख्या देखील शोधू शकता. मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही तुमचं व्हाट्सअप लॅपटॉप सोबत कनेक्ट करू शकता.
Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.