घरचं WiFi नीट काम करत नाहीये, मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to boost your home broadband fast

मित्रांनो इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे स्लो ब्राउझिंग आणि वाय-फाय (Wi-Fi) सिग्नल जाणे यासारख्या समस्या निर्माण होतात. नेटवर्क ऑप्टिमाइझ करण्यासाठी Wi-Fi ची स्ट्रेंथला बूस्ट केली जाऊ शकते. मित्रांनो आज आपण वाय-फाय ची स्पीड कशी वाढवायची (How to boost WiFi speed?) हे जाणून घेणार आहोत.

घरचं WiFi नीट काम करत नाहीये, मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to boost your home broadband fast

इंटरनेटचा वेग तपासणे महत्वाचं

मित्रांनो दर वेळेस अस नाही होत की, तुमच्या वायफायमध्ये समस्या येते, कधी कधी तुमच्या वायर्ड इंटरनेट कनेक्शनमुळे पण असं होत. इथरनेट केबलद्वारे राउटरशी तुमचा संगणक कनेक्ट करून तुम्ही वेग चाचणी करू शकता. जर तुम्हाला प्लॅननुसार वेग मिळत नसेल तर तुम्ही लगेच तुमच्या ISP शी बोला.आपण राउटर अपग्रेड करण्याबद्दल देखील विचार केला पाहिजे.

राउटर फर्मवेअर अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे

मित्रांनो राउटरचे फर्मवेअर अपडेट ठेवणेही महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही चांगले परफॉर्मन्समध्ये सुधारणा, फीचर आणि सिक्युरिटी अपडेट मिळवू शकता. राउटर ॲडमिनिस्ट्रेशन इंटरफेससह फर्मवेअर अपडेट तपासा आणि ते दररोज लागू करा.

राउटरला एका चांगल्या ठिकाणी ठेवा

कधीकधी राउटरच्या प्लेसमेंटमुळे देखील समस्या उद्भवतात. राऊटर नेहमी उघड्यावर ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून घराच्या भिंतींमुळे कोणतीही समस्या येत नाही. तुम्ही घराच्या मध्यभागी राउटर ठेवल्यास, तुम्हाला ऑप्टिमल सिग्नल कव्हरेज मिळेल.

हे सुध्दा वाचा:- 5G नेटवर्क असूनही कॉल ड्रॉप होताय? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी

राऊटरची फ्रिक्वेन्सी चेक करत जा

तुम्ही ड्युअल-बँड राउटर वापरत असल्यास, ऑप्टिमल परफॉर्मससाठी 5GHz बँड वापरण्यासाठी राउटर कॉन्फिगर करा. या बँडसोबत फास्ट स्पीड उपलब्ध आहे. याशिवाय चांगल्या डिव्हाइस कनेक्शनसाठी, दोन्ही बँडचा समान SSID वापरणे आवश्यक आहे.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *