गुगल सर्च इंजिनमध्ये I’m Feeling Lucky हे बटण का दिलं आहे? जाणून घ्या याबद्दल संपुर्ण माहिती |What is google search i m feeling lucky button how it works

मित्रांनो गुगल सर्च (Google search) वापरताना तुम्ही ‘आय एम फीलिंग लकी I’m Feeling Lucky’ हे बटण कधी पाहिले आहे का? जर पाहिले असेल पण त्यावर कधी क्लीक केलं नसेल. गुगल सर्चवरील या स्पेशल बटणाचे कार्य काय, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. या पोस्टमध्ये आपण या खास बटणाबद्दल जाणून घेणार आहोत.

गुगल सर्च इंजिनमध्ये I’m Feeling Lucky हे बटण का दिलं आहे? जाणून घ्या याबद्दल संपुर्ण माहिती |What is google search i m feeling lucky button how it works

काय आहे I’m Feeling Lucky हे बटण

कीवर्डसोबत सर्च

जेव्हा तुम्ही या बटणावर क्लिक करता तेव्हा तुमचे काम बऱ्याच प्रमाणात सोपे होते. जेव्हा Google Search वर कीवर्ड शोधला जातो तेव्हा अनेक वेबसाइट्सच्या लिंक्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात.

जर तुम्ही कीवर्ड टाइप करून I’m Feeling Lucky बटणावर क्लिक केले तर तुम्ही थेट Google वरील पहिल्या लिंकवर पोहोचाल. म्हणजे तुम्हाला अनेक शोध परिणाम दाखवले जात नाहीत.

कोणत्याही कीवर्डशिवाय सर्च

कीवर्ड न टाकता तुम्ही या बटणावर क्लिक केल्यास, तुम्ही Google Doodle च्या जगात पोहोचता. या बटणावर क्लिक करून तुम्ही Google Doodle बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

गूगलचा पाहिला डूडल कधी आला?

Google चे पहिले डूडल 30 ऑगस्ट 1998 रोजी आला. या गुगल डूडलमध्ये युजर्सना ऑफिस मेसेज देण्यात आला होता. हे डूडल Google चे संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांनी लोकांना कळावे यासाठी तयार केले होते की ते बर्निंग मॅनसाठी कार्यालयाबाहेर असतील.

गुगल डूडलची पहिली सिरीज कधी सुरू झाली?

गुगलच्या या स्पेशल बटणावर क्लिक केल्यास गुगल डूडलची पहिली सीरिज 2000 मध्ये सुरू झाली होती. त्याच वर्षी गुगलने प्रथम आंतरराष्ट्रीय डूडल लाँच केले. गुगलने फ्रान्समध्ये बॅस्टिल डे साजरा करण्यासाठी आपले पहिले आंतरराष्ट्रीय डूडल लाँच केले.

हे सुध्दा वाचा:- फोनची SAR व्हॅल्यू म्हणजे काय? आणि ती स्मार्टफोनसाठी का महत्त्वाची आहे? जाणून घ्या

गुगलचे डूडल खास का आहे?

गुगलच्या मते गेल्या 25 वर्षांपासून गुगल डूडलच्या माध्यमातून एक खास प्रसंग, व्यक्तिमत्व, संस्कृती, ठिकाण साजरे केले जात आहे.

I’m Feeling Lucky वर क्लिक करून तुमचा दिवस खास बनवा

आय एम फीलिंग लकी ( I’m Feeling Lucky) वर क्लिक करून तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त बनवलेले खास डूडल तपासू शकता. तुमचा वाढदिवस संपूर्ण जगासाठी एक खास सोहळा म्हणून ओळखला जाऊ शकतो.

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला I’m Feeling Lucky वर क्लिक करावे लागेल.
  • आता गुगल डूडल पेज उघडल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.
  • तुमचे डूडल शोधा खाली तुम्हाला तुमच्या वाढदिवसाची तारीख टाकावी लागेल.
  • आता तुम्हाला Next वर टॅप करावे लागेल.

Note – मित्रांनो आशा करतो तुम्हाला What is google search i m feeling lucky button in Marathi ही पोस्ट आवडली असेल. खूप महत्त्वाची माहिती आहे तर नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *