AI Prompt engineering म्हणजे काय? याचा फायदा काय आहे? | Whats is prompt engineering in Marathi

मित्रांनो जेव्हां पासून Chatgpt आलं आहे तेव्हा पासुन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्या एक वेगळी जागा निर्माण केली आहे आणि आता येणाऱ्या काळात हे आधुनिक तंत्रज्ञान वर्चस्व गाजवणार आहे. सध्या या tool च्या माध्यमातून अनेक अवघड कामे केली जात आहेत.

आशामध्येच एक नाव खूप चर्चेत आला आहे ते म्हणजे AI प्रॉम्प्ट इंजिनियरिंग (AI Prompt engineering). मित्रांनो अनेकांना याबद्दल माहिती नाहीये. भविष्यात हे आपल्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते हे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

एआय प्रॉम्प्ट इंजीनियरिंग म्हणजे काय? | What is AI Prompt engineering in Marathi

एआय प्रॉम्प्ट अभियांत्रिकी समजून घेण्यापूर्वी, तुम्हाला प्रॉम्प्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, जेव्हा आपण इंटरनेटवरून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधतो आणि ते लिहून त्या tool मध्ये टाकतो, तेव्हा त्या टूलला टेक्निकल भाषेत प्रॉम्प्ट म्हणतात. पण सध्या Ai prompt इंजिनीअरिंग खूप चर्चेचा विषय बनला आहे.

जर अजून पण समजल नसेल तर, अजून सोप्या भाषेत समजुन घेऊया, मित्रांनो आपल्याला कोणाकडून कोणतेही काम करून घ्यायचे असेल तर आपण त्याला सूचना देतो आणि त्याचप्रमाणे आपण चॅट जीपीटी किंवा इतर चॅट बॉट्सना काम करण्याच्या सूचना देतो. आपण चॅट बॉटला ज्या काही सूचना देतो, ते त्यावर समान उत्तर तयार करून आपल्याला समोर देत त्याला या एआयच्या जगात प्रॉम्प्ट असे म्हणतात.

प्रॉम्प्ट इंजीनियरिंगच महत्व काय आहे?

आता मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे, हे काही एवढं मोठ काम नाहीये, हे तर कोणाला पण जमू शकते. पण मित्रांनो तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणीही प्रॉम्प्ट लिहू शकत असले तरी, प्रॉम्प्टच्या आधारे चांगले परिणाम कसे मिळवायचे हे फक्त काही निवडक लोकांनाच माहित आहे. ज्यांनी prompt course केला आहे त्यानांच या गोष्टीबद्दल जास्त माहीत असतं.

मित्रांनो जेव्हापासून AI ची लोकप्रियता पसरली आहे, तेव्हापासून प्रॉम्प्ट इंजिनियरिंग खूप चर्चेत आला आहे. प्रॉम्प्ट देऊन चॅट बॉट्समधून चांगले परिणाम मिळवू शकतील अशा लोकांची मागणी सध्या जास्त आहे.

प्रॉम्प्ट इंजीनियरिंग भविष्य काय आहे?

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे जग ज्या वेगाने आपल्या अवतीभोवती पसरत आहे. यावरून असे दिसते की प्रॉम्प्ट इंजीनियरिंगची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे आणि हे skills विकसित करणाऱ्यांसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

आता प्रॉम्प्ट कसा लिहायचा?

तुम्ही कोणत्याही चॅट बॉटला जितके चांगले समजावून सांगू शकतो, तितका तो चांगले परिणाम आपल्याला देतो, याचे उदाहरण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेच असतील. पण मित्रांनो एक चांगला प्रॉम्प्ट कसा लिहायचा हा प्रश्न तर आहेच? त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी खाली दिले आहेत.

  • प्रॉम्प्ट स्पष्टपणे लिहा – तुम्ही चॅट बॉटला जे काही प्रॉम्प्ट देणार आहात ते अगदी स्पष्ट सोप्या भाषेत असले पाहिजे.
  • एका माणसं सारखं त्याला बोला – चांगले results मिळविण्यासाठी, तुम्हाला चॅट बॉटला, समोर एक मनुष्य आहे अस समजून त्यासोबत बोलावे लागेल.
  • पॉईंटवाईज प्रॉम्प्ट लिहा- चॅट बॉटला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पॉईंटवाईज देण्याचा प्रयत्न करा.

Note – मित्रांनो आशा करतो तुम्हाला Whats is prompt engineering in Marathi ही पोस्ट आवडली असेल. खूप महत्त्वाची माहिती आहे तर नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *