जर तुम्हाला पण टॉप क्लास इमेज बनवायची आहे? मग हे 5 फ्री AI टूल तुमच्यासाठी | Best ai image generator for image creator know the details here free

मित्रांनो गेल्या काही महिन्यांत एआयने जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. इतकंच नाही तर AI सोबत येणारी अनेक टूल्स आपले जीवन सुकर बनवत आहे. आता अशी काही टूल्स देखील आली आहेत जी काही Prompt देऊन तुमच्या गरजेनुसार इमेज तयार करू शकतात.

अनेक AI टूल्स आणि वेबसाइट्सच्या येण्याने, AI इमेज जनरेटरने लोकांचे जीवन सोपे आणि अधिक मनोरंजक बनवले आहे. पण, त्यापैकी बहुतेक टूल हे पेड व्हर्जनमध्ये हे फिचर देतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टूल्सबद्दल सांगणार आहोत जे मोफत मिळतात.

जर तुम्हाला पण टॉप क्लास इमेज बनवायची आहे? मग हे 5 फ्री AI टूल तुमच्यासाठी | Best ai image generator for image creator know the details here free

Google Gemini

  • जेमिनी हा एक Google चा चॅटबॉट आहे, जो पूर्वी बार्ड (Google Bard) म्हणून ओळखला जात असे. हे इमेजन 2 वर कार्य करते जे Google चे इमेज क्रिएशन टेक्नॉलॉजी आहे. या तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • यामध्ये, कोणत्याही A प्रॉम्प्टसाठी चार वेगवेगळ्या प्रतिमा तयार केल्या जातात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही सर्वात योग्य पर्याय निवडू शकता.
  • आता गुगलने अँड्रॉइड फोन युजर्सना जेमिनीला त्यांचे डीफॉल्ट असिस्टंट ॲप म्हणून सेट करण्याचा पर्याय देण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही कुठेही, कधीही, फक्त काही Prompt सह इमेज तयार करू शकता.

मायक्रोसॉफ्ट कॉपायलट (Microsoft copilot)

  • हे मायक्रोसॉफ्टचे मोफत एआय इमेज जनरेटर टूल आहे. ज्याला कॉपीलेट म्हणतात. यात इन-बिल्ट इमेज जनरेटर आहे, जो एकाच वेळी चार AI प्रतिमा एका प्रॉम्प्टवरून तयार करू शकतो.
  • मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की, हे OpenAI च्या DALL-E 3 सिस्टमवर कार्य करते, जे ChatGPT साठी कोणत्याही टेक्स्ट प्रॉम्प्टवरून इमेज तयार करण्यासाठी कार्य करते. यामध्ये तुम्हाला उत्तम आणि उच्च दर्जाचे इमेज आउटपुट मिळते. याशिवाय तुम्ही इमेज स्टाइल किंवा थीमचा पर्याय देऊ शकता जसे की डिजिटल आर्ट, ॲनिम, ऑइल पेंटिंग इत्यादी.

फोटो.एआय (Photo.AI)

  • Photo.AI हे सर्व-इन-वन इमेज एडिटर आहे जे इमेज एक्स्टेंडर, फोटोशूट, टेक्स्ट आर्ट जनरेटर आणि टेक्स्ट-टू-इमेज क्रिएटरसह अनेक एआय टूल्ससह येते.
  • Photo.AI चा इमेज जनरेटर इंटरफेस इमेज रेशो तसेच इमेजची शैली आणि प्रकार निवडण्याचा पर्याय देतो. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य आकाराची इमेज निवडू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या गरजेनुसार प्रॉम्प्ट करावे लागेल आणि तुमचे काम एका सेकंदामध्ये होईल.

Adobe Firefly

  • Adobe Firefly हे AI टूल आहे जे Adobe Sensei AI मॉडेलवर चालते. हे कॉपीराइट-फ्री असलेल्या अनेक फ्री-सोर्स इमेजवर प्रशिक्षित आहे.
  • Adobe Firefly चा इंटरफेस अतिशय सोपा आहे. यामध्ये देखील Photo.AI प्रमाणे तुम्ही इमेज आस्पेक्ट रेशो तसेच इफेक्ट्स, व्हिज्युअल एरिया सारखे पर्याय निवडू शकता.
  • तुम्हाला फक्त एक मजकूर प्रॉम्प्ट इनपुट करायचा आहे आणि सॉफ्टवेअर तुमच्या प्रॉम्प्टनुसार चार प्रतिमा रेंडर करतो.
  • याव्यतिरिक्त, तुम्ही जनरेटिव्ह फिल, फिल्टर्स आणि बॅकग्राउंड रिमूव्ह सारख्या टूल्सचा वापर करून इमेज एडिट करू शकता.

हे सुध्दा वाचा:- Instagram चे followers वाढवायचे आहेत, ते पण organic? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी

कॅनव्हा मॅजिक मीडिया ( Canva magic media)

  • मित्रांनो तुमची सोशल मीडिया पोस्ट, बॅनर किंवा कोणतेही क्रिएटिव्ह पोस्ट तयार करायची असेल तर हे टूल तुमच्यासाठी आहे.
  • अलीकडेच कॅनव्हाने एआय टूल देखील आणले आहे, ज्यामध्ये टेक्स्ट-टू-इमेज जनरेटरचा पर्याय उपलब्ध आहे.
  • याला मॅजिक मीडिया असे नाव देण्यात आले आहे. ज्यामध्ये युजर्सना 46 क्रेडिट्स मोफत आणि प्रति प्रॉम्प्ट चार इनेचा पर्याय देते. हे ॲप कॅनव्हा एडिटरमधील ‘ॲप्स’ सेक्शन मध्ये दिसेल.
  • मॅजिक मीडिया युजर्सना वैयक्तिक इमेज तयार करण्यास अनुमती देते.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *