5G नेटवर्क असूनही कॉल ड्रॉप होताय? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी |Reason in 5g network drop problem solution in marathi

मित्रांनो अश्यात कॉल ड्रॉपची (5g network drop) समस्या खूप वाढली आहे, जी नेटवर्क समस्येमुळे असू शकते. पण जर तुम्हाला सतत कॉल ड्रॉपची समस्या येत असेल आणि खूप प्रयत्न करूनही ही समस्या येत असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. Jio, Airtel आणि Vi सारख्या या दूरसंचार कंपन्यांनी अधिक चांगला अनुभव देण्यासाठी त्याच्या नेटवर्कमध्ये सतत सुधार करत असतात. ते अनेक ठिकाणी टॉवर इंस्टॉल करताय. पण तरी पण कॉल ड्रॉपची समस्या असेल तर आज आपण या पोस्टमध्ये जाणून 5g network drop problem च नेमकं काय कारण आहे ज्यामुळे कॉल ड्रॉप होत आहेत.

5G नेटवर्क असूनही कॉल ड्रॉप होताय? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी |Reason in 5g network drop problem solution in marathi

समस्या का वाढत आहेत?

  • गेल्या काही वर्षांत कॉल ड्रॉपची समस्या अचानक वाढली आहे, पण आज आम्ही तुम्हाला त्यामागचे कारण सांगणार आहोत.
  • अहवालानुसार, 5G हे यामागचे कारण असू शकते, कारण 5G एक नवीन नेटवर्क तंत्रज्ञान आहे, जे फक्त रिलायन्स जिओ आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी सादर करणे सुरू केले आहे.
  • जरी या सेवेमुळे वेगवान इंटरनेट स्पीड, कमी लेटन्सी असे फायदे मिळत असले तरी कॉल ड्रॉप्ससारख्या समस्याही येतात.
  • याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कनेक्टिव्हिटी रेंज, कारण 5G बँडची रेंज कमी आहे आणि हे कॉल ड्रॉपचे कारण असू शकते.
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जगभरातील 5G नेटवर्कसाठी वापरलेले दोन मुख्य बँड mmWave आणि sub-6GHz आहेत. Sub-6GHz mmWave पेक्षा थोडे चांगले आहे आणि दीर्घ श्रेणीचे नेटवर्क प्रदान करते, परंतु ते 4G च्या श्रेणीपेक्षा खूपच कमी आहे.
  • आपल्यासाठी ही काही नवीन समस्या नाहिये आणि आपण अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आलो आहोत.

हे सुध्दा वाचा:- 100 फॉलोअर्स असलेले युजर्स देखील इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवू शकतात

कनेक्टिव्हिटी रेंजमध्ये समस्या का आहे?

  • जरी या समस्येचा सामना करण्यासाठी, Airtel आणि Reliance Jio ने देशभरात किंवा किमान 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात अनेक 5G टॉवर इंस्टॉल केले आहेत.
  • परंतु लोकांना अजूनही समस्यांचा सामना करावा लागत आहे कारण 5G नेटवर्क वेगळ्या क्षेत्रात किंवा एका क्षेत्रातून दुसऱ्या भागात जाताना चढ-उतार होत राहते. त्यामुळे, जेव्हा 5G सिग्नलची ताकद कमी होते, तेव्हा फोन आपोआप 4G नेटवर्कवर स्विच होतो.
  • स्विचिंगच्या वेळी तुम्ही कॉल करत असल्यास, फोन काही सेकंदांसाठी सिग्नल गमावतो आणि यामुळे कॉल ड्रॉप होऊ शकतो.

या समस्येवर काय पर्याय आहे?

यावर कायमस्वरूपी उपाय नसला तरी तुम्ही तुमचा फोन आता 5G नेटवर्कवर शिफ्ट करू शकता. यामुळे केवळ कॉलिंगच्या बाबतीतच सुधारणा होणार नाही, तर तुमच्या फोनच्या बॅटरीचे लाईफही काही प्रमाणात सुधारतात.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *