स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पाण्यात पडलाय? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to save a phone or tablet dropped in water

मित्रांनो सध्या स्मार्टफोन (Smartphone) किंवा (Tablet) टॅबलेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पर्सनल कामापासून ते व्यावसायिक कामापर्यंत सर्व काही मोबाईल किंवा टॅबलेट द्वारे पूर्ण केले जाते आणि अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. मित्रांनो अनेकवेळा असे घडते की आपल्या चुकीमुळे स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पाण्यात पडतो. पण अशा वेळेस काय करायचं आपल्याला हे सुचत नाही, त्यामुळे आज आम्ही याबद्दलच्या काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल.

स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पाण्यात पडलाय? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to save a phone or tablet dropped in water

फोन किंवा टॅब्लेट लगेच बंद करा

मित्रांनो फोन किंवा टॅब्लेट पाण्यात पडल्यास, सर्वप्रथम तुम्ही ते बंद केले पाहिजे. हे करणे महत्त्वाचे आहे कारण ते चालू असतानाच त्यात पाणी शिरले तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते.

बॅक कव्हर लगेच काढा

मित्रांनो फोन किंवा टॅब्लेटला बॅक कव्हर असेल तर ते लगेच काढा. डिव्हाइसची बॅटरी वेगळी करता येत असेल तर नक्कीच वेगळी करा.

मऊ कापडाने पुसण्याचा प्रयत्न करा

बहुतेक लोक फोन लवकर सुकण्यासाठी कोणत्याही कपड्याने स्वच्छ करणे सुरू करतात, परंतु असे केल्याने फोन खराब होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही हे करू नये.

हे सुध्दा वाचा:- घरचं WiFi नीट काम करत नाहीये, मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी

तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा

तुम्ही भिजवलेला स्मार्टफोन किंवा टॅबलेट तांदळात दाबूनही ठेवू शकता. असे केल्याने डिव्हाइसचे अंतर्गत भाग हे कोरडे होण्यास होते आणि फोनची दुरुस्ती देखील होते. मित्रांनो अनेकांना हा मजाक चा भाग वाटतो पण हे खर आहे.

ड्रायरने फोन किंवा टॅब्लेट कधीही सुकवू नका

काही लोक ड्रायरने फोन सुकवण्याचा प्रयत्न करतात. तर असे करणे हानिकारक ठरू शकते आणि त्याहूनही आपल्या device चे मोठे नुकसान होऊ शकते.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *