तुम्ही पण गुगल मॅप वापरता का? मग ‘या’ फिचर्स बद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे? |What are Google Maps helpful features?

मित्रांनो आज पण बरेच युजर्स हे गुगल मॅपचा वापर करतात. Google Map ला लॉन्च होऊन जवळपास 15 वर्षे उलटून गेली आहेत. ही भारतातील आणि जगातील सर्वात उपयुक्त सेवांपैकी एक आहे. यामध्ये युजर्सना सुविधा देण्यासाठी असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्ही पण त्यांचा वापर केला तर तुमचे काम खूप सोपे होईल. आज आम्ही तुम्हाला अशा फीचर्स बद्दल सांगणार आहे जे बऱ्याच जणांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

तुम्ही पण गुगल मॅप वापरता का? मग ‘या’ फिचर्स बद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे? |What are Google Maps helpful features?

ऑफलाइन मोडमध्ये Map चा वापर

मित्रांनो फार कमी लोकांना हे माहित नाही की, भारतीय युजर्स हे इंटरनेटशिवाय map वापरू शकतात. गुगल मॅप्स भारतात ऑफलाइन आहे. ज्या भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटी खूपच खराब आहे अशा ठिकाणी हे खूप उपयुक्त ठरू शकते. गुगलने 2015 मध्ये भारतासाठी ऑफलाइन नेव्हिगेशन सुरू केले होते.

टू व्हीलर मोड

मित्रांनो हे फीचर 2017 मध्ये टू व्हीलरला लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आले होते. हे निश्चितपणे भारतातील Google चे पहिले फीचर होते. गुगल मॅप्स द्वारे भारतासाठी मोटरसायकल मोड हे अनेक खास फीचरसह ऑफर करतो. ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव सुधारते.

हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पाण्यात पडलाय? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी

स्टेप सेफर फीचर

स्टेप सेफर फीचर भारतीय युजर्ससाठी 2019 मध्ये सादर करण्यात आले. यामध्ये ते ऑटो किंवा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या युजर्सना त्यांचे वाहन ऑफ-रूट असल्यास अलर्ट देते. हे युजर्सना मित्र आणि कुटुंबासह थेट स्थान सामायिक करण्याचा पर्याय देते. नेव्हिगेशन सुरू करण्यापूर्वी कोणीही हे पाहू शकते.

लँडमार्क आधारित नेव्हिगेशन

भारतीय युजर्सना डोळ्यासमोर ठेवून हे फीचर गुगलनेही लाँच केले आहे. युजर्सना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत चांगले मार्गदर्शन करण्यासाठी Google Map आता मार्गावरील प्रमुख खुणा दाखवतात. Google म्हणतो की, ही माहिती दुचाकी वाहनांसाठी उपयुक्त ठरते, हे सुनिश्चित करते की युजर्सना वाहन चालवताना त्यांचे फोन तपासण्याची गरज नाही.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *